सिमेंट कंपन्यांचे समभाग तेजीत
मुंबई सिमेंट उत्पादक कंपन्यांचे समभाग शेअरबाजारात मंगळवारी तेजीत पाहायला मिळाले. यात अल्ट्राटेकचा समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचला होता. तर अंबुजा सिमेंटचा समभाग जवळपास 4 टक्के वाढत बाजारात 456 रुपयांवर पोहचला होता. मंगळवारी बीएसईवर अल्ट्राटेकचा समभाग इंट्रा डे दरम्यान 2 टक्के वाढत 8049 रुपयांवर पोहचला होता. 30 मे 2023 रोजी कंपनीच्या समभागाने 7972 रुपयांची उच्चांकी प्राप्त केली होती.