मुंबई
कर्नाटक बँकेच्या समभागाने सध्या शेअरबाजारात वधारण्याची कामगिरी कायम ठेवली आहे. या बँकेचा समभाग गेल्या 6 महिन्यात 100 टक्के इतका वाढला असल्याची माहिती आहे. सदरचा समभागाचा भाव आगामी काही महिन्यांमध्ये 191 रुपयांची पातळीही गाठू शकतो, असे तज्ञांना वाटते. कर्नाटक बँकेने डिसेंबरच्या तिमाहीत 300.63 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जो मागच्या तुलनेत 100 टक्के अधिक नोंदला गेला आहे. कर्नाटक बँकेचे समभाग सध्याला शेअरबाजारात 149 रुपयांवर व्यवहार करत आहेत.