मुंबई
ओपेक संघटनेने कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम शेअरबाजारातील तेल कंपन्यांवर सकारात्मक दिसून आला. ओएनजीसीसह इतर कंपन्यांचे समभाग सोमवारी जवळपास 6 टक्के इतके वधारलेले होते. ऑईल इंडियाचे समभाग बाजारात 6.2 टक्के वाढत 267 रुपयांवर तर ओएनजीसीचे समभाग 4 टक्के वाढत 157 रुपयांवर पोहचले होते. ओपेक संघटनेच्या देशांच्या बैठकीत कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.