मुंबई
सऊदी अरबने कच्च्या तेलाच्या (ब्रेंट) उत्पादनात जुलैपासून कपात करण्याची घोषणा सोमवारी करताच या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग भारतीय शेअरबाजारात वधारताना दिसून आले. कच्च्या तेलाच्या किमतीत 1.23 टक्के इतकी वाढ झाल्याने वरील कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले होते. 10 लाख प्रति बॅरलने ओपेक संघटना उत्पादनात कपात करणार आहे. ऑइल इंडियाचा समभाग 2 टक्के वाढत एनएसईवर 255 रुपयांवर तर ओएनजीसीचा समभाग 0.26 टक्के वाढत 155 रुपयांवर व्यवहार करत होता.