वृत्तसंस्था / मुंबई
तेल क्षेत्रात कार्यरत कंपन्या ऑइल इंडिया, ओएनजीसी यांचे समभाग शेअरबाजारात बुधवारी तेजी राखताना दिसले. उत्पन्नात झालेल्या वाढीचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसून आला. गेल्या एक महिन्यात ओएनजीसी व ऑइल इंडिया यांचे समभाग जवळपास अनुक्रमे 7 टक्के, 10 टक्के इतके वधारले आहेत. ऑइल इंडियाचा समभाग बुधवारी 4 टक्के वाढीसह बाजारात 257 रुपयांवर तर ओएनजीसीचा समभाग 2 टक्के वाढीसह 154 रुपयांवर पोहचला होता.