मुंबई :
ऑनलाइन देवाणघेवाणीच्या व्यवसायात असणाऱ्या पेटीएमचा (वन 97 कम्युनिकेशन्स)समभाग सोमवारी शेअरबाजारात चांगलाच उसळी घेताना दिसला आहे. 12 टक्के इतका वाढत बीएसईवर समभाग इंट्रा डे दरम्यान 887 रुपयांवर पोहचला होता. कंपनीचे सीईओ तथा संस्थापक विजयशेखर शर्मा यांनी अँटफीनशी करार केला असून 10.3 टक्के हिस्सा पेटीएममध्ये खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. याचा सकारात्मक परिणाम समभागावर सोमवारी पाहायला मिळाला.