मुंबई
पीजी इलेक्ट्रोप्लास्टचे समभाग शेअरबाजारात मंगळवारी उच्चांकी स्तरावर पोहचले होते. बीएसईवर इंट्रा डे दरम्यान मंगळवारी कंपनीचे समभाग 14 टक्के इतके वाढत 2033 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनी क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंटच्या माध्यमातून 500 कोटी रुपये उभारणार आहे. याकरीता 1614 रुपये प्रति समभाग दर निश्चित केला असून रक्कम उभारणीला 28 रोजीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.