मुंबई
बर्मन कुटुंबियांनी 26 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा आग्रह केल्याने रेलिगेअर एंटरप्रायझेसचे समभाग सोमवारी शेअरबाजारात घसरणीत असताना दिसले होते. समभाग सोमवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 7.3 टक्के इतके घसरत 252 रुपयांवर खाली आले होते. बर्मन कुटुंबिय खुल्या ऑफरअंतर्गत 26 टक्के इतकी हिस्सेदारी घेणार आहेत, असे समजते. या बातमीचा नकारात्मक परिणाम समभागावर दिसला आहे.