मुंबई
टेक महिंद्रा या कंपनीचे समभाग सोमवारी बाजारात वधारताना दिसले. सोमवारी शेअरबाजारात कंपनीचे समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 9 टक्के वाढत 1159 रुपयांवर पोहचले होते. काही दिवसांपूर्वीच टेक महिंद्राच्या सीईओपदी नव्याने मोहीत जोशी यांची निवड करण्यात आली आहे. याचा परिणाम कंपनीच्या समभागावर बाजारात सकारात्मक दिसून आला आहे. जोशी व्यवस्थापकीय संचालकपददेखील सांभाळणार आहेत.