रणवीर सिंह अन् क्रीति सेनॉनला पुरस्कार
67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण पार पडले आहे. या पुरस्कारांवर रणवीर सिंह, क्रीति सेनॉन आणि विक्की कौशल यांचा वरचष्मा राहिला आहे. तर शेरशाह हा सर्वोत्कृष्ट (लोकप्रिय) चित्रपट ठरला आहे. याचे चित्रपटासाठी विष्णू वर्धन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट गायक अन् गायिकेचा पुरस्कारही देण्यात आला आहे.
श्रेणी पुरस्कारविजेते
सर्वोत्कृष्ट गायक बी प्राक (मन भरया, शेरशाह)
सर्वोत्कृष्ट गायिका असीस कौर (राता लंबिया, शेरशाह)
सर्वोत्कृष्ट गीत कौसर मुनीर (लहरा दो, 83)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन विजय गांगुली (चका चक, अतरंगी रे)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) एहान भट्ट (99 सॉन्ग्स)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) शर्वरी वाघ (बंटी और बबली 2)
सर्वोत्कृष्ट पटकथा शुभेंदु भट्टाचार्य (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सई ताम्हणकर (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) सरदार उधम
सर्वोत्कृष्ट चित्रपट (लोकप्रिय) शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन विष्णू वर्धन (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) विद्या बालन (शेरनी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) विक्की कौशल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रीति सेनॉन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंह (83)