ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नी सुप्रिया माझिरे यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
निलेश माझिरे हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माथाडी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नीने गुरुवारी सकाळी विषप्राषण केले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : कसब्याच्या जागेवरून आघाडीत बिघाडी
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माझिरे यांनी मनसेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून 400 कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला होता. माझिरे हे मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक होते.