शिरोळ प्रतिनिधी
Kolhapur Shirol News : काही मूठभर मुस्लिम समाजाच्या अल्पवयीन तरुणांच्यामुळे संपूर्ण समाज बदनाम होत आहे. याला आळा घालण्यासाठी शिरोळ शहर मुस्लिम समाजाच्या वतीने प्रत्येक कुटुंबांना नोटीसा लागू केल्या आहेत. शहरातील मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राबवलेली हा उपक्रम कौतुकास्पद आहे. हा उपक्रम प्रत्येक गावागावात राबविल्यास जातीय तेढ निर्माण होणार नाही, असा विश्वास शिरोळ शहर मुस्लिम सुन्नत जमाअतचे अध्यक्ष सिकंदर बागसार व असलम शेख यांनी दिली.
शिरोळ शहरामध्ये 600 मुस्लिम कुटुंब आहे. गेले अनेक वर्ष हिंदू मुस्लिम समाज एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहत आहे. परंतु,काही मुस्लिम समाजातील अल्पवयीन तरुण मुले दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.व्हाट्सअप,स्टेटस,व्हिडिओ, मेसेज,यासह अन्य माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करीत आहेत. यामुळे सर्व मुस्लिम समाज नाहक बदनाम होत आहे. अशा मूठभर लोकांच्या मुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण केला जात आहे. कुटुंबातील प्रमुखांनी सामाजिक धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणतेही मेसेज व्हायरल केल्यास त्यास समाजाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुस्लिम समाजाने हा उपक्रम राबविल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. शहरातील हिंदू मुस्लिम समाजामध्ये गुण्या गोविंदाने रहावेत शांतता राहावी हा हेतू असल्याचे सिकंदर बागसार व असलम शेख यांनी सांगितले. यावेळी शहाजान शेख नूर महंमद मोमीन यांच्या या नोटीस वर स्वाक्षऱ्या आहेत. सदर नोटीसीची प्रत शिरोळ पोलीस ठाण्याचे शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनाही देण्यात आले आहे.