बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शहर परिसरात उत्साहाने साजरी करण्यात आली. विविध संघटना, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि आजी-माजी नगरसेवक आणि आमदार आदींनी एसपीएम रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. समाज माध्यमांवर महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्यावतीने शासकीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी विविध संघटनांनी उद्यानातील श्र्री छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वैयक्तिकरीत्या काही संघटनांनी अभिवादन केले. त्याचप्रमाणे माजी महापौर-उपमहापौर, आजी-माजी नगरसेवकांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. काही युवक मंडळांनीही शिवजयंती साजरी केली. शासकीय पातळीवरील शिवजयंती प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये साजरी करण्याचा आदेश बजावला होता. त्यामुळे रविवारी सुटीदिवशी ग्रामपंचायतींमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. तारखेप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करताना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छांची देवाणघेवाण झाली. शिवप्रेमींनी मोबाईलवर छत्रपती शिवाजी महाराजांचा डीपी ठेवून स्वाभिमान दर्शविला.
Previous Articleवैभव भारतमातेसाठी करायचे आहे!: रामदेवबाबा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.