शिवाजी उद्यानात शिवमूर्तीचे पूजन : ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळवतीने मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. एसपीएम रोड येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे हा भव्य सोहळा आयोजित केला होता. मान्यवरांच्या उपस्थितीत शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. माजी महापौर मालोजी अष्टेकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या हस्ते आरती झाली. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवमूर्तीला फुलांची आरास करण्यात आली होती. यावेळी प्रकाश मरगाळे, भाऊराव कातकर, मदन बामणे, शिवराज पाटील, श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अॅड. अमर यळ्ळूरकर, अंकुश केसरकर, अनिल आमरोळे, गणेश द•ाrकर, वासू सामजी, आनंद पाटील, किरण हुद्दार, विक्रम पाटील, राजू बिर्जे, प्रशांत भातकांडे, धनंजय पाटील यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवतेज युवा संघटना, मच्छे
मच्छे : शिवतेज युवा संघटना मच्छे यांच्या मार्गदर्शनाखाली 350 वा शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा मच्छे येथे पार पडला. शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती म्हणून ओळखले जातात. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा साम्राज्य स्थापन केले. त्यानंतर सर्वमान्यता मिळावी या हेतूने शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रात व कर्नाटकात उत्साहात साजरा केला जातो. मूर्तीला पूजा व हार घालून प्रार्थना करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर मिठाईचे वाटप करून फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रास्ताविक विनायक चौगुले यांनी व आभार बजरंग धामणेकर यांनी मानले. कार्यक्रमाला भूजंग चोगुले, विक्रांत सनदी, शुभम केसरकर, सुहास गोरल, अमर गोरल, गजानन छपरे, नारायण अनगोळकर व परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा मंदिर संस्था
मराठा मंदिर संस्थेच्यावतीने 350 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव होते. त्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संचालक बाळासाहेब काकतकर, शिवाजी हंगीरकर, चंद्रकांत गुंडकल, नेमिनाथ कंग्राळकर, नागेश तरळे, विश्वासराव घोरपडे, व्यवस्थापक ढोबळे, दिनकर घोरपडे, अनिल जांबोटकर आदी उपस्थित होते.
कोरे गल्ली गणेशोत्सव मंडळ
कोरे गल्ली शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अनिल कडोलकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. पंच कल्लाप्पा हंडे, शिवाजी हावळाण्णाचे, सुरेश बोकडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष नगरसेवक नितीन जाधव, महेश पाटील, महेश कुंडेकर, विजय डी., संजय बोकडे, शुभम केरवाडकर, समीत पाटील, दीपक गौंडाडकर, विलास चौगुले, सुशांत कुरंगे, उदय शहापूरकर, सुनिल कुरंगे यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत हावळाण्णाचे यांनी केले.
अजित औरवाडकर यांनी रेखाटली शिवराज्याभिषेकाची सुंदर रांगोळी
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षपूर्तानिमित्त येथील रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी 3 फूट बाय 6 फूट आकारामध्ये शिवराज्याभिषेकाची रांगोळी रेखाटली आहे. कलारत्न बिल्डींग, नाझर कॅम्प, येळ्ळूर रोड येथील ज्योती स्टुडिओमध्ये ही रांगोळी रेखाटण्यात आली असून 12 तारखेपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत ती सर्वांना पाहण्यास खुली आहे.