काणकोण : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेकदिन चावडी-काणकोण येथील कदंब बसस्थानकावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून साजरा करण्यात आला. सरकारी स्तरावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सभापती रमेश तवडकर, खोल जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, माजी नगराध्यक्ष अजय भगत, उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, उपनगराध्यक्ष नारसिस्को फर्नांडिस, नगरसेविका अमिता पागी, हेमंत ना. गावकर, अन्य नगरसेवक, काणकोण भाजप मंडळाचे प्रमुख विशाल देसाई तसेच काणकोणातील विविध सरकारी कार्यालयांचे प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती तवडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाराभाराविषयी माहिती दिली. खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजा होते. गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांचे हितरक्षण करणारे होते. शिवाजी महाराज हे धुरंदर आणि आदर्श राजा होते. जनतेचे हित लक्षात घेऊन त्यांनी अनेक कायदे तयार केले. आजच्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनताभिमुख राहावे आणि छत्रपतींचा आदर्श घेऊन जनतेच्या बाबतीत संवेदनशील वृत्तीने वागावे, असे तवडकर पुढे म्हणाले. उपजिल्हाधिकारी गावकर यांनी स्वागत, तर शिरीष पै यांनी सूत्रसंचालन केले.
Previous Articleभाजपा नेत्यांची माजी केंद्रीयमंत्री एदुआर्द फालेरो यांच्याशी भेट
Next Article तिशे बोरी येथे सापडला मृत बिबट्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.