Shivrambhau’s death anniversary was celebrated at Nemale Kaul factory
सहकारी कौल उत्पादन संस्था मर्यादित नेमळे येथे कैलासवासी शिवरामभाऊ जाधव यांची ११वी पुण्यतिथी अध्यक्ष, संचालक मंडळ, कामगार व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. बुधवारी 2 नोव्हेंबर सकाळी सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांची ११ वी पुण्यतिथी सहकारी कौल उत्पादक संस्था मर्यादित नेमळे येथे साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन आत्माराम भिकाजी राऊळ यांच्या हस्ते तसबीरीला पुषहार घालण्यात आला आणि शिवरामभाऊ यांच्या कार्याची माहित देण्यात आली.
सावंतवाडी/प्रतिनिधी-