ऑनलाईन टीम/तरुण भारत
नवनीत राणा (navneet rana) आणि रवी राणा (ravi rane) यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करत अटक केली होती. यांनतर त्यांना भेटण्यासाठी किरीट सोमय्या गेले असता संपत शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आतापर्यंत दोनवेळ हल्ले झाले आहेत. त्यामुळे यापुढे किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यास ‘शूट अॅट साईट’चे आदेश देऊ, असा कठोर पवित्रा CISF ने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (CISF) गंभीर दखल घेण्यात आली होती. झेड दर्जाची सुरक्षा असूनही किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आतापर्यंत दोनवेळ हल्ले झाले आहे. यापुढे किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यास आम्ही ‘शूट अॅट साईट’चे आदेश देऊ, असा कठोर पवित्रा CISF ने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
सोमय्या यांनी सोमवारी दिल्लीत गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेतली होती. यानंतर सूत्र हालल्याचं बोललं जातंय. मात्र, आता सीआयएसएफने हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतलंय. पुन्हा सोमय्यांवर हल्ला झाल्यास ‘शूट अॅट साईट’चे आदेश देऊ’ असा आक्रमक पवित्र CISF ने घेतल्याची माहिती आहे.
‘शूट अॅट साईट’चे आदेश देऊ; गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले
याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना सीआयएसएफने (CISF) मुंबई पोलिसांना खरोखरच असे सांगितले आहे का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून गृहमंत्र्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले की, मला असे वाटत नाही की, CISF ने असा काही आदेश दिला असेल. असा आदेश देण्याची परवानगी कोणालाच नसते. त्यांचं काम संरक्षण करणे आहे. महाराष्ट्र पोलीस किंवा सीआयएसएफ असतील अशा पद्धतीचा निर्णय कुठेही नसतो. तरीही आपल्याकडे जी माहिती आहे त्याची मी खातरजमा करेन, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.