बेळगाव : तालुक्यातील अगसगे गावातील श्रेयस निंगाप्पा पाटील 14 वर्षांखालील मुलांच्या राज्य फुटबॉल संघात निवड झाली असून तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी बेंगळूरला रवाना होणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे आयोजित सब-ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी श्रेयसची 14 वर्षाखालील मुलांच्या कर्नाटक संघात निवड झाली आहे. श्रेयस याआधी अनेक फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उतम कामगिरी केली आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल अकादमी युवा लीगमध्ये 18 गोल केले. श्लोक स्पर्धेत 14 गोल आणि मॅराडोना स्पर्धेत 6 गोल करून, तो संघातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून उदयास आला आहे. त्याची ही कामगिरी पाहुण राष्ट्रीय स्प्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली. मूळचे अगसगे गावचे वडील निंगाप्पा पाटील हे बेंगळुरू येथे एका आयटी कंपनीत काम करतात. त्यामुळे श्रेयस बेंगळुरूमध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच फुटबॉलमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले आहे. श्रेयसच्या या यशाबद्दल यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मलगौड पाटील, काँग्रेस सेवादलाचे राज्य सहसचिव शिवपुत्र मेत्री, सेफ वॉर्ड संघटनेचे अध्यक्ष संतोष मेत्री यांनी अभिनंदन केले व गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
Previous Articleपुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुपारी 2 तासांचा ब्लॉक
Next Article महांतेशनगर विभागीय क्रीडास्पर्धांना प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment