वार्ताहर /लाटंबार्से
आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला जाणाऱया वारकरी मंडळाच्या वारी गोव्याच्या विविध क्षेत्रातून पंढरपूरला मार्गस्थ झाल्या आहेत. डिचोली तालुक्मयातील मेणकुरे येथून थ्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदायची पायीवारी दि. 27 जून रोजी रवाना झाली असून ती आता 158 किलोमीटरचे अंतर पार करून जैतापूरपर्यंत पोहोचली आहे. पंढरपूर येथे दि. 9 जुलै रोजी पोहोचणार आहे.
वारी नियोजनबद्ध मार्गक्रमण करीत असून ठीक ठिकाणी गाववाले उत्साहाने स्वागत करीत आहेत, अशी माहिती दिंडी प्रमुख देवानंद नाईक तसेच गणपत डांगी (वारकरी) यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली. त्यांच्याबरोबर उपदिंडी प्रमुख म्हणून अभिजीत तेली व सुरेंद्र गाड हे नियोजन करीत आहेत तर सचिव चंद्रकांत वंसकर हे व्यवस्थापन करीत आहे.