Shubhangi Salgaonkar passed away
मूळ कुडाळ साळगाव वेशीवाडी येथील रहिवासी आणि सध्या कुडाळ औदुंबरनगर शिवगौरी अपार्टमेंट येथे वास्तव्यास असलेल्या सौ शुभांगी रामचंद्र साळगावकर (७४) यांचे मंगळवार ६ डिसेंबरला सकाळी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. कुडाळ माजी तालुका मास्तर रामचंद्र साळगावकर यांच्या त्या पत्नी, कुडाळचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी अरुण साळगावकर यांच्या त्या भावजय, सांगेली हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक हनुमंत नाईक यांच्या त्या सासू तर पेंडूर हायस्कुलच्या दिवंगत शिक्षिका पूर्वा नाईक यांच्या त्या मातोश्री होत.
झाराप / प्रतिनिधी