पर्ये : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सम्राट क्लब साखळीतर्फे पर्ये सत्तरी येथे सिडबॉल बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.यावेळी शिक्षक श्री रामदास शेटकर यांनी सीडबॉल कशे करावेत व त्यांचा उपयोग कसा करता येईल याची माहिती दिली.हल्लीच झालेल्या वणव्यात सत्तरी भागात ब्रयाच प्रमाणात जंगल नष्ट झालेले आहे.त्यावर जंगल तयार करण्यासाठी या सीडबॉलचा वापर उपयुक्त ठरेल. नुसत्या बिया मोकळ्या जागेत टाकल्यास, त्या पक्षी, जनावरे, किटक खाऊ शकतात किंवा पावसाच्या पाण्याबरोबर नदी नाल्यात जाऊ शकतात. मात्र सीडबॉल मुळे बी रूजण्यास आणि त्यातून रोपटे तयार होण्यास वातावरण निर्मिती झालेले असते असे रामदास शेटकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले. पर्यावरण दिवस साजरा करत असताना प्रत्यक्षात काहीतरी करता यावे या हेतूने ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी समृद्धी ट्युटोरियलच्या 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व जवळ जवळ 800 सीडबॉल्स तयार केले.त्यात जांभूळ भियाण्यांचा वापर करण्यात आला.सम्राट क्लब साखळीतर्फे असा हा उपक्रम एक नवीन जंगल तयार करण्यासाठी खारीचा वाटा ठरू शकतो. यावेळी सम्राट क्लब साखळीचे अमोल बेतकीकर, शिक्षिका सौ. शुभदा सावईकर, दिनेश माईणकर तसेच समृद्धी नर्सरीचे मालक सुनील गणपुले उपस्थित होते.
Previous Articleरवींद्रभवनच्या पोट्रेट पेंटिंग स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद
Next Article कवि विनोद नाईक यांच्या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.