बेळगाव – कर्नाटकात मराठा समाजाला 3 बी मधून 2- ए मध्ये आरक्षण मिळावे या मागणीच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा फेडरेशन आणि सकल मराठा समाज यांच्यातर्फे सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान येथे मंगळवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी बेळगाव सुवर्ण विधान सौधला सभेला घेराव घालून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी दिली.
बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाचे परमपूज्य मंजुनाथ स्वामीजी, श्यामसुंदर गायकवाड आदींसह कर्नाटकातील अनेक आमदार व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकल मराठा 3 – बी मधून 2 – ए मध्ये आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष करत आहोत. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला हे आरक्षण मिळावे अशी मागणी आहे. बेळगावत उद्यापासून सुरू होणाऱ्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान येथे २० डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौधला घेराव करण्यात येणार असून आंदोलनात बेळगाव शहर व राज्यातील २५ हजारहून अधिक मराठा समाज बांधव सहभागी होतील अशी अपेक्षा आहे असे जाधव यांनी सांगितले.
Trending
- एपीएमसी पोलिसांकडून अट्टल मोटारसायकल चोराला अटक
- फळबाजारात वाढतेय हापूसची आवक
- राष्ट्रीय मराठा पार्टी 10 जागा लढविणार
- हुबळी जन्मभूमी, बेळगाव कर्मभूमी
- कर्मभूमी म्हणाऱ्या शेट्टर यांनी जिल्ह्याला काय दिले?
- गॅरंटी योजनांमुळे सर्वजाती-धर्मातील महिलांना मदत
- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवजयंती साजरी
- जिल्ह्यात 12 हजार पाळीव डुकरांना लस