सावंतवाडी । प्रतिनिधी
त्रिनेत्र मित्र मंडळ आचरा संचलित मसल क्रिएशन फिटनेस आणि कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत कु. प्रसन्ना प्रदीप परब हिने सिंधुदुर्ग स्ट्राँग वुमनचा किताब पटकावला. या स्पर्धेत २ गोल्ड मेडल, ज्युनिअर स्ट्राँग गर्ल, सीनिअर स्ट्राँग गर्लचे किताब पटकावले. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.