Kolhapur Breaking News : कोल्हापुरात दोन दिवसापूर्वी सात तरुणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवले. ही माहीती हिदुत्ववादी संघटनेला समजताच काल शहरात वातावरण तंग झाले होते.हिंदूत्ववादी यांनी काल कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदीर येथील हिंदू ऐकता कार्यालयात हिंदूत्ववाद्यांची भेट घेतली.याप्रसंगी बंद मागे घेण्यास पोलीस अधीक्षक पंडीत यांनी सांगितले. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही धर्मांधांकडून सोशल मीडियावरुन महापुरुषांची विटंबना सुरु आहे. लव्ह जिहादचे प्रकार वाढत आहेत. तरीही पोलीसांकडून ठोस अशी कारवाई होत नाही. त्यामुळे हे प्रकार वाढतच असल्याचे सांगत बंदच्या भुमिकेवर हिंदूत्ववादी ठाम राहिले. आज सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येण्याचे आवाहन बैठकी दरम्यान करण्यात आले.त्यानुसार हजारोंच्या संख्येने शिवनसैनिक चौकात जमले. पोलीसांनी आंदोलकांना शांत राहण्याचे तसेच एकाच ठिकाणी आंदोलन करा अशी विनंती केली आहे. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, कोल्हापुरातील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. शहरातील अनेक भागात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असून तणाव निर्माण झाला आहे.कोल्हापुर महानगरपालिका चौकातील रिक्षा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी फोडली आणि उलटवली. तर चप्पल लाईनला असलेले हॉलिऊड शूजचे दुकान देखील फोडले . हिंदुत्ववादी कार्यकर्ते शहरभर पसरले आहेत.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.जिल्हा बंदीचा आदेश झुगारून लाखो कार्यकर्ते कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरले आहेत. मटन मार्केट परिसरात पोलीसांना लाटीचार्ज केला. पोलीसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे.मात्र आंदोलनातील एक गट मोर्चा काढण्यावर ठाम आहे.