बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सीगन चषक वरि÷ क्रिकेट स्पर्धेत बुधवारी एसकेई अकादमीने नियो मार्केटींगचा 4 गडय़ांनी तर के. आर. शेट्टी संघाने इलेव्हन स्टार संघाचा 116 धावांनी पराभव केला. प्रसाद नाकाडी, शुभम खोत यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात निओ मार्केटींगने 20 षटकात 9 बाद 133 धावा केल्या. मधुकर कांबळेने 22 अमित जाधवने 18, अजहर शेखने 19 धावा केल्या. एसकेईतर्फे प्रसाद नाकाडी व गौरव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेईने 19.1 षटकात 6 गडी बाद 134 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. मंथन देसाईने 36, आदित्य वारंगने 20 धावा केल्या. निओ तर्फे नियाजने 3 तर अकबरने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात के. आर. शेट्टीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 194 धावा केल्या. सलमान गोकाककरने 67, शुभम खोतने 33, प्रणय शेट्टीने 17 धावा केल्या. इलेव्हन स्टारतर्फे जलिनने 3, मालदारने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना 11 स्टारचा डाव 14.1 षटकात 78 धावात आटोपला. त्यात तौशिफ शेखने 14 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे वासीमने 3, तर सुनिल सक्री व रब्बानी दफेदार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.