सोलापूर प्रतिनिधी
पत्नीचे गावातील एका व्यक्तीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे गावात होत असलेली बदनामी तसेच पत्नी व तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोला तालुक्यातील कटफळ येथे घडली. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता सुखदेव शेळके (वय 27) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दत्ता यांच्या पत्नीचे गावातील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती दत्ता यांना कळाली होती. याबाबत त्याने पत्नीला वेळोवेळी समजावून सांगितले. पण पत्नी ही पतीचे ऐकत नव्हती. या प्रकारामुळे गावात होत असलेली बदनामी तसेच पत्नी व तिच्या प्रियकर आणि पत्नीचा भाऊ यांच्याकडून होणाऱया मानसिक त्रासाला कंटाळून दत्ता याने 23 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी दत्ता यांचा चुलत भाऊ दादासो मारुती शेळके याने सांगोला पोलिसामध्ये तक्रार दिली आहे. यानुसार पत्नी, तिचा प्रियकर आबासो बिरा खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजुलवर करित आहेत.