महापौर शोभा सोमणाचे यांनी परिसरात भेट देऊन अधिकाऱ्यांना केल्या सूचना
बेळगाव : अशोकनगर परिसरात ड्रेनेजची समस्या गंभीर बनत चालली आहे. याबाबत नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी महापौरांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांनी गुरुवारी या परिसराला भेट देऊन सदर समस्या दूर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. अशोकनगर, सुभाषनगर तसेच इतर परिसरात ड्रेनेजची समस्या निर्माण झाली आहे. शिवाजीनगर परिसरात देखील गटारींची समस्या आहे. या सर्व समस्या सोडवण्याबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यासाठी विशेष निधीची तरतूद करून तातडीने या समस्या दूर कराव्यात. जनतेकडून तक्रारी येऊ नयेत याची दखल अधिकाऱ्यांनी घेणे गरजचे आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य जनताही नगरसेवकांकडेच अधिक तक्रारी करत असते. तेव्हा तातडीने या परिसरातील समस्या सोडवा, असे त्यांनी सांगितले. यावेळी सत्ताधारी गटनेते राजशेखर ढोणी उपस्थित होते.