ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना नेते संजय राऊत (sanjy raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. राऊत यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ट्विटरवरुन नवीन गौप्यस्फोट करण्याचा इशारा राऊत यांनी दिला होता. या इशाऱ्यानुसार त्यांनी बुधवारी सकाळी किरीट सोमय्यांच्या नव्या घोटाळ्याची महिती दिली आहे. संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एक ट्विट केलं आहे. यामध्ये संजय राऊत यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड म्हणजेच एनसएसईएलसंदर्भातील ५६०० कोटींच्या घोटाळ्यामध्ये (NSEL Scam) सोमय्यांनी लाखो रुपये आपल्या युवक प्रतिष्ठानसाठी (yuvak pratishthan) घेतल्याचा आरोप केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (national spot exchange ltd.)म्हणजेच एनसएसईएलसंदर्भातील ५६०० कोटींच्या घोटाळ्यामध्ये सोमय्यांनी लाखो रुपये आपल्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतल्याचा आरोप केलाय. “एनसएसईएलच्या ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याच्या चौकशीची मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ईडीने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशीसाठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला. २०१८-१९ असे दोन वर्ष सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले,” असा आरोप राऊत यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलाय. ट्विटरवरुनही यासंदर्भात पोस्ट शेअर करताना त्यांनी ‘किरीट का कमाल’ नावाखाली हे आरोप केलेत.