Sonali Patkar’s Balasaheb’s entry into the Shiv Sena party
भरड येथील सौ. सोनाली सर्वेश पाटकर यांनी शनिवारी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. सातत्यपूर्ण सामाजिक काम करताना पक्ष संघटना वाढवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील असे सौ. पाटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजय आंग्रे मालवण दौऱ्यावर असताना मालवण येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. यावेळी मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, भास्कर राणे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, किसन मांजरेकर, राजा गावकर, ऋत्विक सामंत, अरुण तोडणकर, बाळू नाटेकर, नीलम शिंदे, भारती घारकर, युटीन फर्नांडीस, राजा तोंडवळकर, तोडणकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मालवण / प्रतिनिधी