नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी नियमित तपासणीसाठी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना 12 जून रोजी याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून त्यांची सर गंगाराम रुग्णालयात नियमित तपासणी केली जात आहे. डॉ. अरुप बासू यांच्या नेतृत्त्वाखालील विशेष वैद्यकीय पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. हिवाळय़ाच्या दिवसात श्वास घेण्यात अडचणी येत असल्यामुळे त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार असल्याचे बुलेटीनमध्ये नमूद करण्यात आले आहे.