उद्योजक आशीष सोबत थाटला संसार
‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातील अभिनेत्री सोनाली सहगलने मंगळवारी स्वत:चा प्रियकर आशीष सजनानीसोबत विवाह केला आहे. दोघांनी मुंबईतील एका गुरुद्वारामध्ये विवाह केला आहे. अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्याची काही छायाचित्रे अन् व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून यात सोनाली वधूच्या पेहरावात सोहळ्याच्या स्थळी प्रवेश करताना दिसून येते.
सोनाली सहगलच्या विवाहसोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली ओ. यात मंदिरा बेदी, रिद्धिमा पंडित, चाहत खन्ना, सुमोना चक्रवर्ती आणि करण ग्रोव्ह देखील सामील होता. याचबरोबर अभिनेता कार्तिक आर्यनने देखील सोनालीच्या विवाहसोहळ्यात उपस्थिती दर्शविली.
सोनालीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु तिला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळविता आले नाही. तिने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटाद्वारे केली होती. हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला होता. यानंतर तिने ‘जय मम्मी दी’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘नूरानी चेहरा’, ‘सेटर्स’, ‘वेडिंग पुलाव’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.