प्रतिनिधी /बेळगाव
कर्ण बधिरत्व व तोल जाण्याचा विकार यावर केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला होता. कानाची रचना अत्यंत सुक्ष्म असून त्याबाबतच्या समस्या किंवा तक्रारींचे निवारण केएलई हॉस्पिटल येथे केले जाते. बेंगळूर येथे केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये प्रथमच कर्ण बधिरत्वावर कॉक्लीयर इम्प्लान्ट शस्त्रचिकित्सा करण्यात आली. याचा लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी केले.
याच अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण कार्यशाळाही घेण्यात आली. त्यावेळी डॉ. कोठीवाले बोलत होते. त्यांनी आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजनेबद्दल माहिती देऊन मुलांमधील कर्ण बधिरत्वाचे लवकर निदान झाल्यास लवकर उपचार करताना येतात, असे सांगितले. जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. एन. एस. महांतशेट्टी यांनी लहान मुलांच्या अवयवांची वेळीच चाचणी करणे सुकर होते, असे सांगितले. अध्यक्ष डॉ. एम. व्ही. जाली यांनी व्हर्टिगो आजाराबद्दल विवेचन केले. डॉ. बी. पी. बेल्लदवर यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. श्रीनिवास डी. आर., डॉ. वासंती आनंद, डॉ. शशिधर सत्तीगेरी, डॉ. राजीव एस. आर. यांनी निरंतर वैद्यकीय शिक्षण सत्रामध्ये विचार मांडले.