आर्किटेक्ट-रोटरी क्लब वेणुग्रामचा संयुक्त उपक्रम : आयएमईआर कॉलेजमध्ये आयोजन
बेळगाव : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट बेळगाव सेंटर व रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुंदर घरकुल व अंतर्गत सजावट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता, त्यांच्या घरी जाऊन परीक्षकांनी परीक्षण केले. रविवारी या स्पर्धेचा समारोप झाला. आयएमईआर कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला आर्किटेक्ट प्राजक्ता देशपांडे, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य कुलकर्णी, आर्किटेक्ट कुलदीप हंगिरगेकर, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, अश्विनकुमार कलमनी, डॉ. राहुल साठे, निखिल चौगुले, मैत्रेयी बैलूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याच निमित्ताने आर्किटेक्ट प्राजक्ता देशपांडे यांचे ‘पुरातन वास्तुंचे जतन’ या विषयावर व्याख्यान झाले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- फ्लॅट आणि अपार्टमेंट विभागामध्ये प्रथम- पुष्पा विनोद देशपांडे, द्वितीय- प्रकाश वीरप्पा शिरोळ, फोर बीएचके विभागात प्रथम- नीलम गुट्टीगोळी, द्वितीय- नम्रता गजानन वेलंगी, रिनोव्हेटेड हाऊस विभागात प्रथम- लक्ष्मीकांत देशपांडे, द्वितीय- दानिक्ष सावंत, प्लॉट एरिया 2400 स्क्वे. फुटापर्यंत विभागात प्रथम- बसवराज मालेशंकर, द्वितीय- मडिवाळप्पा तिगडी, 2400 स्क्वे. फुटांवरील प्लॉट विभागात प्रथम- डॉ. माधव प्रभू, द्वितीय- रणदेव पुल्लकडे यांनी क्रमांक मिळविले.