ओटवणे प्रतिनिधी
Spontaneous response to women’s health screening camp in Majgaon
माजगाव ग्रामपंचायत आणि पडवे येथील एस.एस.पी.एम मेडीकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला आरोग्य तपासणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात सुमारे १५० महिलांची तपासणी करण्यात आली.माजगाव शाळा नं १ च्या सभागृहात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजगाव सरपंचा डॉ सौ अर्चना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपसरपंच संतोष वेजरे उर्फ बाळा वेजरे, माजी उपसरपंच संजय कानसे, ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी, प्रज्ञा भोगण, गिता कासार, मधु कुंभार, अजय सावंत, सुधिर वारंग आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिरात डॉ. पूर्वा राऊत, डॉ. प्रणाली पाटील, डॉ. रिजवान बोबडे, डॉ. संजय जोशी, डॉ सुप्रिया धाकोरकर यांनी महिलांची तपासणी करुन गर्भाशय कर्करोग, स्तनाचा कर्करोग, तोंडाच्या कर्करोगावर मार्गदर्शन केले.