प्रतिनिधी/ पॅरिस
भारताच्या मुरली श्रीशंकरने शनिवारी फ्रान्समधील पॅरिस डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्समध्ये पुऊषांच्या लांब उडी स्पर्धेत 8.09 मीटर्सच्या प्रभावी प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले. मुरली श्रीशंकरने तिसऱ्या प्रयत्नात ही दिवसाची सर्वोत्तम झेप मिळाली. 8.09 मीटरच्या प्रयत्नाने त्याला खरे तर ग्रीसचा ऑलिम्पिक आणि डायमंड लीग विजेता मिल्टियाडिस टेंटोग्लू याच्या पाठोपाठ दुसरे स्थान प्राप्त करून दिले होते. मिल्टियाडिसने 8.13 मीटर्स इतकी लांब उडी मारून पॅरिस डायमंड लीग जिंकली.
तथापि, चौथ्या प्रयत्नात मुरलीच्या हातून फाऊल घडल्याने आणि स्वित्झर्लंडच्या सायमन एहॅमरने 8.11 मीटरची झेप घेतल्याने भारतीय खेळाडूला तिसऱ्या स्थानावर सामाधान मानावे लागले. श्रीशंकरचा पाचवा प्रयत्न 7.99 मीटर्स इतका नोंदला गेला आणि त्याचा सहावा प्रयत्न फाऊलने संपला. मुरली श्रीशंकरची डायमंड लीगमध्ये सहभागाची ही दुसरी खेप आहे. त्याने गेल्या वर्षी मोनॅकोमध्ये 7.94 मीटर्सच्या प्रयत्नासह सहावे स्थान पटकावले होते. त्याशिवाय गेल्या वर्षी त्याने 8.36 मीटर्सची वैयक्तिक सर्वोत्तम झेप घेतली होती. पुऊषांच्या लांब उडीमध्ये भारताच्या जेस्विन ऑल्ड्रिनने या वर्षाच्या सुऊवातीला 8.42 मीटर्स अशी लांब उडी मारून राष्ट्रीय विक्रम केलेला आहे.