म्हासुर्ली / वार्ताहर
धामणी खोऱ्यातील कळे- म्हासुर्ली मार्गावरील पणोरे पैकी बळपवाडी (ता.पन्हाळा) येथील बामण ओढा वळणावर एस.टी.बस व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये मोटर सायकलवरील सखाराम सदाशिव जाधव (वय-३६,खुपिरे,करवीर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तर पत्नी सिमा जाधव, व मुलगी स्वरांजली किरकोळ जखमी झाल्या आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की. सखाराम जाधव हे आज सकाळी पत्नी व मुलीसह म्हासुर्ली येथे सासरवाडी आले होते. नातेवाईकांची भेट घेऊन दुपारी चार वाजता जाधव आपल्या कुटुंबासह परत खुपिरे गावी चालले होते.
कळे – म्हासुर्ली मार्गावरील बळपवाडी येथील बामण ओढा वळणावर रंकाळा ते बावेली एस.टी.बस व हिरो मोटरसायक यांची समोरासमोर धडक झाली. यात सखाराम जाधव यांच्या दोन्हीही पाय व हाताना गंभीर दुखापत झाली आहे. तर पत्नी सिमा व मुलगी स्वरांजली बाजूला उडून पडल्याने किरकोळ जखमी झाल्या असून सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी कोल्हापूरला दवाखान्यात दाखल करण्यात आले.