फिनिक्स चषक 13 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित दहावी फिनिक्स चषक 13 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यातून गुडशेफर्ड, कनक मेमोरियल, संत मीरा, इस्लामिया, फिनिक्स पब्लिक, केएलएस, सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स संघांनी बाद फेरीत प्रवेश मिळविला.
कनक मेमोरियल स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या फिनिक्स चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात गुडशेफर्ड संघाने कर्नाटक दैवज्ञ संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात गुडशेफर्डतर्फे दक्ष मुलेने सलग 3 गोल केले तर अरमान बेपारीने 1 गोल केला. दुसऱया सामन्यात कनक मेमोरियल संघाने पोतदार इंटरनॅशनल संघाचा 9-0 असा पराभव केला. पवन पम्मारने 4 गोल केले. हुसेन बसरिकट्टीने 2, गणेश भावर, झेद पटेल, नवीन पुजारी यांनी प्रत्येकी 1 गोल केले. तिसऱया सामन्यात संत मीरा संघाने लव्हडेल संघाचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात संत मीरातर्फे जीवदान पावशेने 2, रशीद गौरगोंडाने 1 गोल केला. तर लव्हडेलतर्फे आयुष्मान निंगनूर याने 1 गोल केला. चौथ्या सामन्यात इस्लामिया संघाने एमव्हीएमचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात इस्लामियाच्या रियान पटवेकरने एकमेव गोल केला.
पाचव्या सामन्यात फिनिक्स पब्लिक संघाने मदनी संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात संदीप दाबी, अवराज देसाई, पालाश मालगीमनी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. सहाव्या सामन्यात केएलएसने बाशीबन संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात अनिकेत पाटीलने पहिला गोल केला. हर्षद कारेकरने दुसरा तर साहील रंगरेजने तिसरा गोल केला.
सातव्या सामन्यात सेंट पॉल्स संघाने अमृता विद्यालयाचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात महंमद हुसेन जी. याने 2, आराध्य नाकाडी व श्रेयस तरळे यांनी प्रत्येकी 1 गोल तर अमृता विद्यालयतर्फे जाधवने 1 गोल केला. आठव्या सामन्यात सेंट झेवियर्स संघाने गुडशेफर्ड संघाचा 3-1 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे रोशन अब्बासने 2 तर झेन मुल्लाने 1 गोल केला. गुडशेफर्डतर्फे सौरभ सालोखेने एकमेव गोल केला.
सोमवारचे बाद फेरीचे सामने
गुडशेफर्ड वि. संत मीरा सकाळी 9 वा., भरतेश सेंट्रल वि. पोतदार इंटरनॅशनल 10 वा., एमव्हीएम वि. फिनिक्स पब्लिक सकाळी 11 वा., ज्ञान प्रबोधन वि. इस्लामिया 12 वा., बाशिबन वि. सेंट पॉल्स 2 वा., केएलएस वि. जी. जी. चिटणीस दुपारी 3 वा.