आकाशाचा रंग धुसर होतोय : नाइट स्काय ब्राइटनेस दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढतोय
आगामी 20 वर्षांमध्ये लोकांना तारे दिसणार नसल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. याकरता लाइट पॉल्युशन कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लाइट पॉल्युशनमुळे आकाशाचा रंग धुसर होत चालला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास रात्रीच्या वेळी आकाशाचा रंग आता काळा नव्हे तर ग्रे दिसतो, अशा स्थिती काही तारेच दिसून येत असल्याचे ब्रिटनमधील खगोलशास्त्रज्ञ मार्टिन रीस यांनी सांगितले आहे.
आर्टिफिशियल लागट, मोबाइल-लॅपटॉप यासारखे गॅझेट्स, शोरुम्सबाहेर लावण्यात आलेले एलईडी, कारची हेडलाइट किंवा होर्डिंग्सचा आकर्षित करणारा तीव्र प्रकाशमुळे लाइट पॉल्युशन होते. मागील काही वर्षांमध्ये नाइट पॉल्युशन वाढले आहे. दरवर्षी नाइट स्काय ब्राइटनेस 10 टक्क्यांनी वाढत असल्याचे खगोलशास्त्रज्ञांचे सांगणे आहे.
लाइट पॉल्युशनमुळे जगातील एक तृतीयांशपेक्षा अधिक लोकसंख्येला आकाशगंगा दिसून येत नाही. सध्या ज्या ठिकाणी 250 तारे दिसून येतात, तेथे 18 वर्षानी केवळ 100 तारेच दिसून येतील असे जर्मन सेंटर फॉर जियोसायन्सचे ख्रिस्तोफर क्यबा यांनी म्हटले आहे.
लाइट पॉल्युशनमुळे इकोलॉजिकल धोका देखील आहे. अमेरिका आणि युरोपचे 99 टक्के लोक लाइट पॉल्युशनयुक्त आकाशाखाली राहतात. पृथ्वीचे 24 तासांचे दिवसरात्रीचे क्लॉक असते. हे सूर्यप्रकाश अन् काळोखाने निश्चित होते, हे या ग्रहावर राहणाऱ्या प्रत्येक जीवावर लागू होते, परंतु माणसांनी यात फेरफार केल्याचे शांघायच्या रुइजीन रुग्णालयाचे डॉक्टर यूजू यांनी म्हटले आहे. लाइट पॉल्युशनमुळे किडे-किटक तसेच अन्य जीवांचे जीवनचक्रच बदलून गेले आहे. या प्राण्यांचा अकाली मृत्यू होत असून यामुळे जगभरात जैववैविध्याचे मोठे नुकसान होत आहे.
मधुमेहाचे प्रमाण वाढले
स्ट्रीटलाइट आणि स्मार्टफोन यासारख्या आर्टिफिशियल लाइट्समुळे मधुमेह होण्याची शक्यता 25 टक्क्यांर्यंत वाढत असल्याचे चीनमध्ये झालेल्या संशोधनात आढळून आले आहे. रात्री देखील दिवसासारखी अनुभूती घडविणारा हा प्रकाश मानवी शरीरचक्राला बदलू शकतो आणि यामुळे शरीरातील रक्तशर्करा पातळी नियंत्रित करण्याची क्षमता कमी होत जाते.
ग्लूकोज पातळीत वाढ
जे लोक सदैव कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात राहतात, त्यांच्या शरीरात ग्लूकोज पातळी काहीही सेवन न करताही वाढू लागते. यामुळे आमच्या शरीरात बीटा सेल्सची सक्रीयता कमी होत जाते. या सेलच्या सक्रीयतेमुळेच पँक्रियाजमधून इन्सुलिन हार्मोन रिलिज होतात. आर्टिफिशियल लाइटचा कमाल संपर्क जगातील आधुनिक समाजाची समस्या आहे आणि मधुमेह होण्याचे हे मोठे कारण ठरले असल्याचे डॉ यूजू यांनी म्हटले आहे.