बेळगाव प्रतिनिधी – बेंगलोर प्रमाणे उत्तर कर्नाटक मध्ये नॅशनल लॉ कॉलेज सुरू करावे या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. यावेळी निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्यामुळे वकिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लॉ शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला आहे. मात्र केवळ बेंगलोर येथे नॅशनल लॉ कॉलेज आहे, त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ असते बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्याच दर्जाचे लॉ कॉलेज उत्तर कर्नाटकामधील बेळगाव मध्ये सुरू केले तर त्याचा संपूर्ण उत्तर कर्नाटकातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तेव्हा या मागणीचा गांभीर्याने विचार करून बेळगाव मध्ये लॉ कॉलेज सुरू करा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. https://tarunbharat.com/the-little-girl-was-thrown-in…/
शिरस्तेदार एम एम नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अँडव्होकेट .प्रभू यत्नटी, उपाध्यक्ष सचिन सुब्बन्नावर, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील, सदस्य महांतेश पाटील, प्रभाकर पवार अँडव्होकेट.आर .सी.पाटील, वकील . एम. बी. जिरली, जॉईन सेक्रेटरी अँडव्होकेट.बंटी कपाई, अँडव्होकेट. शिवपुत्र पटकळ , अँडव्होकेट. व्हाय. एन .सुतार इत्यादी उपस्थित होते.
Previous Articleआदिवासी भागातील प्रश्नावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी ; आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांवर सुधीर मुनगंटीवार आक्रमक
Next Article वर्षा पर्यटनाला गगनबावडा घालतोय साद !