वार्ताहर /कंग्राळी बुद्रूक
अलतगा येथे सांडपाणी निचरा योजना कामाचे कामाचे खोदाई करून पूजन करण्यात आले. सांडपाणी निचरा योजनेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने तसेच त्यांच्या निधीतून 13 लाख रुपये मंजूर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम होते. प्रारंभी सेक्रेटरी कल्लाप्पा चौगुले यांनी प्रास्ताविकमध्ये कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळी देवस्थान पंचकमिटीचे सदस्य सिद्राय दळवी, राजू कांबळे, हणमंत कंग्राळकर यांच्याहस्ते पूजन करून खोदाई कामाचे उद्घाटन करण्यात आले. अलतगा गावच्या महालक्ष्मी यात्रेवेळी विविध विकास कामांची पूर्तता केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या प्रयत्नातून झाल्याबद्दल अनिल पावशे यांनी ग्रामस्थांच्यावतीने मलगौडा पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच या कामांची गुणवत्ता, काम उत्कृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत असल्याचे सांगून नारायण पावशे यांनी आभार मानले.यावेळी शैलेश पवार, बाळू पाटील, यल्लाप्पा कांबळे, ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे, अमर आलोजी, कंत्राटदार अष्टेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे खजिनदार महेश दळवी यांनी आभार मानले.