काही भाज्यांच्या दरवाढीबरोबरच कांदा-बटाटा दरातही काहीशी वाढ
वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, बटाटा दरात प्रति क्विंटल 200 रुपयांनी वाढ झाली आहे. श्रावणमासाला सुरुवात झाल्याने विशेषतः गोवा व इतर ठिकाणांहून भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे काही भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
एकीकडे अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढत चालले आहेत. परिणामी परराज्यांतून भाजीपाल्यांची आवक होत आहे. दरम्यान, श्रावणानिमित्त गोव्यातील विविध मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते. शिवाय मांसाहार वर्ज्य करून शाकाहाराला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गोव्यात भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. याबरोबरच इतरही अनेक ठिकाणी भाजीपाल्याला मागणी वाढली आहे.
बटाटा लागवड यंदा 50 टक्क्यांवर
पावसामुळे बिन्स खराब झाले आहे. त्यामुळे बेंगळूर आणि तुमकूर येथून बिन्स मागविले जात आहे. इंग्लिश गाजर शिमला आणि उटी येथून येत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱयांनी दिली. येत्या काळात पुन्हा भाजीपाला दर वाढण्याची शक्मयता आहे. गत दोन वर्षात बटाटा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा बटाटय़ाची लागवड 50 टक्क्मयांवर आली आहे. परिणामी उत्पादनात घट होणार असल्यामुळे यंदा बटाटा दरात वाढ होण्याची शक्मयता आहे.
सध्या कांदा बांगलादेश, दुबई, अरब राष्ट्रांमध्ये निर्यात होण्यास सुरुवात झाली आहे. चांगल्या दर्जाच्या कांद्याची निर्यात होत असल्याने कांद्याचा भाव वाढला आहे. ही वाढ प्रति क्विंटल 200 रुपयांनी झाली आहे. पाऊस आणि थंड हवामानामुळे कांदा खराब झाला आहे. त्यामुळे हलक्मया दर्जाचा कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी …… 1200 ते 1500 रु.
- घटप्रभा कोथिंबीर 1300 ते 1500 रु.
- बेळगाव कोथिंबीर 1000 ते 1200 रु.
- चायना कोथिंबीर 1000 ते 1200 रु.
- शेपू ……….. 500 ते 600 रु.
- पालक ……. 400 ते 500 रु.
- कांदा पात .. 400 ते 500 रु.
- लाल भाजी 500 ते 700 रु.
महाराष्ट्र कांदा दर प्रति क्विंटल
- गोळी …. 1000 ते 1400 रु.
- मध्यम … 1400 ते 1600 रु.
- मोठा ….. 1600 ते 1800 रु.
- गोळा . 1800 ते 2000 रुपये
- इंदूर बटाटा 2200 ते 2400 रु.
- आग्रा बटाटा 2100 ते 2200 रु.
भाजीपाला दर प्रति दहा किलो
- हिरवी मिरची 380 ते 400 रु.
- जी-फोर मिरची 550 ते 580 रु.
- पांढरी मिरची 300 ते 350 रु.
- तुकडा मिरची 280 ते 320 रु.
- बटका मिरची 300 ते 350 रु.
- काळी मिरची 350 ते 360 रु.
- ढबू मिरची 600 ते 620 रु.
- इंडस ढबू मिरची 500 ते 550 रु.
- बिन्स …… 550 ते 600 रु.
- बेंगळूर बिन्स 580 ते 620 रु.
- कारली …. 400 ते 450 रु.
- वांगी …… 280 ते 300 रु.
- काळी वांगी 300 ते 350 रु.
- बोळगी वांगी 280 ते 300 रु.
- दोडकी …. 400 ते 420 रु.
- कोबी …… 250 ते 270 रु.
- इंग्लिश गाजर 400 ते 500 रु.
- भेंडी ……. 300 ते 320 रु.
- बिट …….. 300 ते 350 रु.
- जवारी काकडी 300 ते 350 रु.
- आले 450 रु.
कर्नाटक कांदा दर प्रति क्विंटल
- गोळी …. 800 ते 1200 रु.
- मीडियम 1200 ते 1400 रु.
- मोठा .. 1500 ते 1600 रु.
- गोळा 1700 ते 1800 रु.