वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंड क्रिकेट संघाचे विद्यमान प्रमुख प्रशिक्षक गॅरी स्टेड यांना क्रिकेट न्यूझीलंडने करारामध्ये वाड केली असून आता ते 2025 पर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात न्यूझीलंड संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहतील. सदर माहिती क्रिकेट न्यूझीलंडचे सरव्यवस्थापक ब्रायन स्ट्रोनेच यांनी दिली आहे.
2018 साली गॅरी स्टेड यांची न्यूझीलंड संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर क्रिकेट न्यूझीलंडने त्यांच्याबरोबर केलेल्या करारात दुसऱ्यांदा मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत स्टेड यांच्याबरोबरचा करार अस्तित्वात होता पण आता त्यांना 2025 पर्यंत वाढ देण्यात आली आहे.