मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पुन्हा इशारा : जुने गोवे येथे महात्मा गांधी जयंती कार्यक्रम
पणजी : गोव्यात सर्वधर्म समभाव असून सर्व जाती-धर्माचे लोक सलोखा राखून गुण्यागोविंदाने नांदतात. तेव्हा दुसऱ्या धर्माचा द्वेष कऊ नका. आपल्या धर्माची प्रार्थना जऊर करा परंतु दुसऱ्या धर्माबाबत वादग्रस्त पोस्ट किंवा वक्तव्य कऊ नका. जे कुणी हे वाईट काम करतात त्यांनी ते त्वरित बंद करावे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा दिला आहे. जुने गोवे येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्dयाकडे काल सोमवारी झालेल्या त्यांच्या राज्यस्तरीय जयंती दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
गांधीजींची शिकवण पाळा
मुख्यमंत्री म्हणाले की, गांधी यांनी अहिंसा आणि सर्वधर्म समभावाची शिकवण दिली असून ती सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. दुसऱ्या धर्माचा द्वेष करु नये, दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखवू नये अशी शिकवण त्यांनी दिलेली आहे. त्यांचे विचार घेऊन ते आचरणात आणणे आणि त्यांचा प्रचार-प्रसार करणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
वाईट पोस्टवर कारवाई करणार
अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय या तत्त्वानुसार सरकार कार्यरत असून मागील काही दिवसात इतर धर्मांच्या भावना दुखावणारे पोस्ट समाजमाध्यमांवर घालण्याचे प्रकार समोर आले आहे. ते यापुढे सहन केले जाणार नाहीत. असले प्रकार करणे चुकीचे असून ते करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्dयास पुष्पांजली वाहून त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार अलिकडे वाढीस लागले असून तसले कृत्य कोणी कऊ नये. त्यांना शोधून काढण्यात येईल आणि कारवाई होईल असा इशारा डॉ. सावंत यांनी दिला आहे. गोव्यातील सर्वधर्म समभाव टिकवून ठेवण्याची गरज असून तो बिघडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करावेत. राज्यातील जातीय सलोखा देशासाठी आदर्श असल्याचे निवेदन डॉ. सावंत यांनी केले.