दोडामार्ग – वार्ताहर
एमआयडीसी’च्या आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना वितरित करून हे क्षेत्र कार्यान्वित करण्याबाबत एमआयडीसी महामंडळ, राज्यशासन यांनी चालविलेल्या अनाकलनीय दिरंगाईच्या निषेधार्थ व शासनाचे, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी आज २० ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लक्षवेधी ‘लाँगमार्चला असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला आहे.