प्रतिनिधी /बेळगाव
शहरात भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली असून, लहान मुलांसह रात्रीच्यावेळी बाहेर जाणाऱया नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. याची दखल घेत महापालिकेने नसबंदी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून नसबंदी मोहीम राबविण्यात येणार आहे.
भटक्मया कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुलांवर हल्ला करण्याबरोबरच रात्री-अपरात्री कामावर जाणाऱया नागरिकांवरही हल्ला करून जखमी करण्याचे प्रकार वाढले आहेत. लहान मुलांवर हल्ला करण्यात आल्याने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने यापूर्वी निविदा मागविल्या होत्या. पण निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला नसल्याने तीन वर्षांपासून ही मोहीम राबविण्यात आली नाही. मात्र अलीकडेच महापालिकेने पुन्हा निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये दोन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी एक कंपनी पात्र झाली आहे. सदर कंपनीने नसबंदी उपक्रम राबविण्यास तयारी दर्शविली आहे.
श्रीनगर येथे नसबंदीसाठी अत्याधुनिक सुविधांसह ऑपरेशन थिएटर बांधण्यात आले आहे. याठिकाणी कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार आहे. सदर कंपनीला याची माहिती देण्यात आली असून याठिकाणी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, त्याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या महापालिका आयुक्त रजेवर असल्याने वर्कऑर्डर काढण्यात आलेली नाही. महापालिका आयुक्त रुजू झाल्यानंतर वर्कऑर्डर देऊन नसबंदी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. दि. 1 जुलैपासून ही मोहीम सुरू करण्याचा आदेश देण्याचा विचार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.