सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे तहसिलदारांना निवेदन
सावंतवाडी प्रतिनिधी
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगतीने न्यायालयामार्फत चालविणे आणि पाचोराचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन सावंतवाडी तालुका पत्रकार समिती च्या वतीने तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी निवेदन सादर केली सावंतवाडी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदारॲड संतोष सावंत माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे अमोल टेंबकर, ,सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, प्रवीण मांजरेकर उमेश सावंत उपाध्यक्ष काका भिसे, उमेश सावंत,मोहन जाधव,राजू तावडे, , आनंद धोंड, शैलेश मयेकर,अनुजा कुडतरकर आदी उपस्थित होते .
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यत आम्हां पत्रकारांच्या भावना कळवा अशी विनंती यावेळी पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आली आहे.