6महिन्यात 53 टक्के वाढ : स्मार्टवॉचसह इतर उत्पादने मागणीत
वृत्तसंस्था /मुंबई
कॅलेंडर वर्ष 2023 च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये स्मार्टवॉचसह भारतीय बाजारपेठेत वेअरेबल उत्पादनांच्या मागणीमध्ये 53 टक्के इतकी दमदार वाढ दर्शवली गेली आहे. कॅलेंडर वर्ष 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये शंभरहून अधिक स्मार्टवॉचची बाजारात एंट्री झाली होती. स्मार्टवॉच, इयरवेअर आणि आय वेअर अशा वेअरेबल उत्पादनांची भारतामध्ये जवळपास 57.8 दशलक्ष इतकी पाठवणी करण्यात आली आहे. सदरची आवक ही कॅलेंडर वर्ष 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये झाल्याचे इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन (आयडीसी)यांच्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. भारतीय वेअरेबल बाजारपेठेचा विकास वरील प्रमाणे वाढल्याची बाब आयडीसीच्या अहवालात दिसून आली आहे. आगामी काळामध्ये विविध सण, उत्सव साजरे होणार असून या काळामध्ये वेअरेबल उत्पादनांना ग्राहकांची अधिक पसंती दिसून येणार असल्याचेही भाकीत आयडीसीने केले आहे. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्यांकडून आकर्षक सवलतीच्या ऑफर्सही दिल्या जाणार आहेत.
स्मार्ट वॉचला सर्वाधिक पसंती
पहिल्या सहा महिन्यांमध्ये अवधीमध्ये स्मार्ट वॉचची 128 टक्के इतकी विक्रीमध्ये वाढ दिसली आहे. इयरवेअर उत्पादनांनीदेखील 27 टक्के वाढ नोंदवली आहे.