नॉटींगहॅम
इंग्लंडचा संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर असून शनिवारी येथे खेळविण्यात येत असलेल्या वनडे सामन्यात इंग्लंडने 50 षटकात 8 बाद 334 धावा जमवित आयर्लंडला विजयासाठी 335 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडच्या विल जॅक्स आणि सॅम हेन यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंड संघातील जॅक्सने 88 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह 94, सॅम हेनने 82 चेंडूत 8 चौकारांसह 89, डकेटने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 48, सॉल्टने 6 चौकारांसह 28, कार्सेने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 32 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 6 षटकार आणि 30 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे डॉक्रेलने 43 धावात 3, यंगने 38 धावात 2, अॅडेर, लिटल आणि मॅकेर्थी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड 50 षटकात 8 बाद 334 (जॅक्स 94, हेन 89, कार्से 32, डकेट 48, सॉल्ट 28, डॉक्रेल 3-43, यंग 2- 38).