मुंबई
औषध क्षेत्रात कार्यरत टोरेंट फार्माच्या समभागाने शेअरबाजारात 8 टक्के वाढत नवी विक्रमी पातळी गाठण्यात यश मिळवलं आहे. हे यश कंपनीच्या मार्चअखेरच्या तिमाहीतील दमदार नफ्यामुळे शक्य झाले असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी कंपनीचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 8 टक्के वाढत 1851 रुपयांवर पोहचला होता. कंपनीने चौथ्या तिमाहीत 287 कोटी रुपयांचा कर पश्चात नफा प्राप्त केल्याची माहिती आहे. याआधीच्या वर्षी 118 कोटी रुपये तोटा कंपनीने सोसला होता.