मिरजेत लक्ष्मी मार्केटला आयुक्ताची भेट
सांगली : मिरजेतील लक्ष्मी मार्केटची इमारत 1935 रोजी बांधली गेली. या इमारतीला जवळपास 100 वर्षे होत आहेत. त्यातच काही दिवसांपासून या इमारतीचा थोडा- थोडा भाग कोसळत चालला आहे. इमारतीमधील व्यापाऱ्यांनी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने या इमारतीची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी मिरजेतील लक्ष्मी मार्केटच्या इमारतीला भेट दिली. पाहणी करून हि इमारत जुनी झाली असून हेरिटेज इमारतीचे नियम तपासून लवकरात लवकर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्य़ाचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तात्पुरत्या स्वरूपात व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी डागडूजीच्या करण्याचा विचार करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी व्यापाऱ्यांना दिले. पावसाळ्यात भिंतीतून पत्र्यातून पाणी गळणे, काही भागांचे काँक्रीट निघणे या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले जाईल. सारख्या गोष्टीचा समावेश करण्यात येईल व यावर निर्णय लवकरात लवकर घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी दिली.